स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ६ ते ८ मार्च ‘नमन’ रत्नागिरी, दि.५ (जिमाका) : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात उद्या बुधवार दि. ६ ते ८ मार्च रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत नमन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नमन महोत्सवाचा रसिक प्रेक्षकांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे व संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

सादरकर्ते: बुधवार, दि. ६ मार्च रोजी झरेवाडी नाट्य नमन मंडळ मंदरुळ,राजापूर, बळीवंश कलामंच कांदिवली मुंबई, श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ माभोळे,जाधववाडी, संगमेश्वर. गुरुवार दि. ७ मार्चरोजी साई श्रद्धा कलापथक कानसे ग्रुप चिखली,ता. गुहागर, जि. रत्नागिरी, नवलाईदेवी नमन मंडळ कुर्णे, पयडेवाडी, लांजा, नवविकास नमन मंडळ अबिटगाव, दत्तवाडी, चिपळूण. शुक्रवार, दि. ८ मार्च रोजी आई जीवदानी कला फाऊंडेशन नाट्य नमन मंडळ वीर, चिपळूण, खळनाथ रिमिक्स नमन मंडळ, लयभारी, रत्नागिरी, सिद्धिविनायक नाट्य नमन मंडळ मु.पो. मंदरुळ गणेशवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी असे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button