श्री भवानी रुद्र सोमेश्वराचा महाशिवरात्री उत्सव उद्या ६ मार्च पासून सुरू होणार
रत्नागिरी: सालाबादप्रमाणे श्री भवानी रुद्र सोमेश्वराचा महाशिवरात्री उत्सव उद्या ६ मार्च पासून सुरू होणार आहे. ११ मार्च पर्यंत चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील शिरगाव शिवरेवाडी या ठिकाणी दरवर्षी श्री भवानी रुद्र सोमेश्वराचा महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होतो यावर्षी देखील हा उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे बुधवार दि ६ मार्च रोजी रात्री ९ वाजता आरती व भोवत्या रात्री १०.३० नंतर ह भ प श्री गिरीश बुवा दामले यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवार दि.७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता महिला मंडळाचे भजन तर रात्री ९ वाजता आरती व ह भ प कु तेजस्विनी जोशी व ह भ प श्री वेदांग जोशी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. शुक्रवार दि. ८ मार्च रोजी महाशिवरात्र उत्सव साजरा होणार आहे सकाळी १०.३० वाजता सामूहिक जप पठण परस्पर परिचय व सत्कार आणि खिचडी वाटप कार्यक्रम होणार आहे तसेच सायंकाळी ७ वाजता भजन तर ९ वाजता आरती व ह भ प गिरीशबुवा दामले किर्तन होणार आहे. शनिवार दि ९ मार्च रोजी रात्री ९ वाजता आरती व ह भ प कु वैष्णवी धुंडिराज जोशी यांचे कीर्तन होणार आहे रात्री १०.३० वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडणार आहेत. रविवारी १० मार्च रोजी रात्री ९ वाजता आरती व ह भ प गिरीशबुवा दामले यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे रात्री १०.३० वाजता लळीताचे नाटक ‘शांतेच कार्ट चालू आहे’ अस नाटक असणार आहे. सोमवार दि ११ मार्च रोजी सकाळी लघुरुद्र आरती व महाप्रसाद आणि त्यानंतर सांगतेची सभा संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाने केले आहे.www.konkantoday.com