राष्ट्रीय महामार्गाची* *अपूर्णावस्था ही आपल्यासाठी सर्वाधिक दुःखदायक बाब* *-खा. विनायक राऊत*
देशातील रखडलेल्या प्रकल्पांमध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गा चौपदरीकरणाचा प्रथम क्रमांक आहे. केंद्र शासनाने लाडावून ठेवलेल्या ठेकेदारांमुळे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण अद्यापही ठप्प आहे. राष्ट्रीय महामार्गाची अपूर्णावस्था ही आपल्यासाठी सर्वाधिक दुःखदायक बाब असल्याची खंत खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.गेली १३ वर्षे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याच्या पाठोपाठ सुरू झालेले अनेक महामार्ग कार्यान्वित झाले आहेत. सर्वपक्षीय पाठपुराव्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत नाही ही खंत आपल्या मनात कायम असल्याचे राऊत यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या उडान योजनेत रत्नागिरी विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. सातत्याने निधी देवूनही विमानतळावरून वाहतूक सुरू होत नसल्याबद्दल राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. पश्चिम घाटात गेल्या काही वर्षापासून भूस्खलन होवून गावेच्या गावे उध्वस्त होत आहेत. पश्चिम घाटाचे पट्ट्याचे केंद्र शासनाने सर्वेक्षण करून संपूर्ण भाग संरक्षित करावा यासाठी संबंधित मंत्र्यांकडे आपला पाठपुरावा सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले. www.konkantoday.com