रामदास कदमांच्या वक्तव्याचा भाजप जिल्हाध्यक्षांकडून खेद
शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी गुहागर विधानसभा मतदार संघातील खेडमध्ये भाजपबाबत विधान केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेमध्ये मतभेद झाल्याचे दिसून येत असून रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य खेदजनक असल्याची प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दिली आहे. तर लवकरच यासंदर्भात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असेही केदार साठे म्हणाले आहेत, त्यामुळे निवडणुकी आधीच महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पहायला मिळते. www.konkantoday.com