रत्नागिरी- सिंधुदुर्ग मधून किरण सामंत यांना उमेदवारी द्या.. कार्यकर्त्यांनी केली मागणी.* *शिवसेनेच्या शहराच्या बैठकीत किरण सामंत यांनाच उमेदवारी देण्याचा केला एक मतांनी ठराव
रत्नागिरी मध्ये लोकसभेच्या निवडूणुकीसाठी रत्नागिरी – सिंधुदुर्ग मधून महायुतीचा उमेदवार म्हणून किरण सामंत यांच्या नावाची घोषणा करावी अशी मागणी रत्नागिरी मधील माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यांनी मागणी केली आहे.आज माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांची सभा रत्नागिरी येथे पार पडली रत्नागिरी- सिंधुदुर्ग मधून किरण सामंत यांना उमेदवारी द्या.. कार्यकर्त्यांनी केली मागणी करत शिवसेनेच्या शहराच्या बैठकीत किरण सामंत यांनाच उमेदवारी देण्याचा केला ठराव एक मतांनी मांडण्यात आला. जनतेचा आवाज म्हणून लोकसेभेत किरण सामंतच रत्नागिरी – सिंधुदुर्गचे नेतृत्व करू शकतात असा विश्वास यावेळी अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यानी व्यक्त केला.विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. लोकसभेसाठी मीच किरण सामंत म्हणून काम करणार असल्याचा निर्धार यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी केला आहे. यावेळी किरण सामंत यांनी मार्गदर्शन करताना झालेली विकास कामे यांचा आढावा घेतला आणि जी जी कामे आपण केली ती लोकां पर्यत पोचवा त्याचा प्रचार प्रसार करा. असे सांगितले. मी जनतेच्या सेवेसाठी २४ तास काम करणार आहे. आपण ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवला त्या पद्धतीने मला आशीर्वाद द्या असे आहावन किरण सामंत यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे, जेष्ठ नगरसेवक राजन शेट्ये,माजी नगरसेवक सुदेश मयेकर, बिपीन बंदरकर, स्मितलताई पावसकर, तसेच रत्नागिरीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com