
रत्नागिरी पालिका ऍक्शन मोडवर ,**रत्नागिरीत ५० थकबाकीदारांची मालमत्ता सील
रत्नागिरी पालिका ऍक्शन मोडवर आली आहे. घरपट्टी थकबाकीदारांना दणका देत थेट इमले सील केले जात आहेत. आतापर्यंत ५० इमले पालिकेच्या वसुली पथकाने सील करण्याची कारवाई केली आहे. मागील थकबाकी आणि चालू घरपट्टी एकूण १४ कोटींच्या उद्दीष्टांपैकी ७ कोटी म्हणजेच ५० टक्के घरपट्टी वसुली झाली आहे. एवढेच नाही, काही थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार असून १०० जणांना नळ जोडणी तोडण्याचे नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.रत्नागिरी शहरामध्ये सुमारे तीस हजार इमले धारक आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी १४ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल होतो. मार्च महिना सुरु झाला तरी ५० टक्केच घरपट्टी वसुली झाली आहे. त्यामुळे वसुलीसाठी पालिकेच्या मालमत्ता विभागाने तीन पथके तयार करून वसुली सुरू केली आहे. आतापर्यंत ६ कोटी ५५ लाख आणि धनादेश मिळून ७ कोटी कर वसूली झाली आहे. गाडी फिरवून मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी वारंवार आवाहन केले गेल. तरी अजूनही अनेक करदात्यांनी कर न भरल्याने आता पालिका वसूली पथक ऍक्शन मोडवर आले आहे.गेल्या दोन ते तिन दिवसांपासून थकबाकीदारांचे इमले सील करण्याची कारवाई सुरू आहे. आजवर ५० इमले पालिकेच्या पथकाने सील केले आहेत.www.konkantoday.com