
कुटुंबासोबत फिरण्यासाठी आलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू
राजापूर ः लग्नानंतर अवघ्या दहा दिवसातच धरणाच्या पाण्यात बुडून तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील पाचल नजिकच्या अर्जुना धरण परिसरात घडली. शशिकांत लक्ष्मण खेडेकर (२६) असे बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. कुटुंबासमवेत फिरण्यासाठी अर्जुना धरण परिसरात तो गेला होता.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास शशिकांत खेडेकर हा आपल्या कुटुंब व मित्रांसोबत अर्जुना धरणावर फिरण्यासाठी गेला असता शशिकांत आंघोळीसाठी अर्जुना धररणाच्या पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात जावून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.