
पुण्याचे जगताप कुटुंब बनले गायींसाठी देवदूत
खेड तालुक्यातील लोटे येथील गोशाळेसाठी पुणे पिंपरी-चिंचवड येथील स्वर्गीय माजी आमदार, गोभक्त लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांनी ७० टन चारा पाठवून दिला आहे. त्यामुळे येथील १ हजार १०० गायींची महिनाभर भूक भागणार आहे. यामुळे गायींसाठी देवदूत ठरलेल्या या कुटुंबियांचे गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे यांनी आभार मानले आहेत.गेल्या कित्येक वर्षापासून कोकरे हे श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थानच्या माध्यमातून ही गोशाळा चालवत आहेत. सध्या गोशाळेत १ हजार १०० गायी आहेत. मात्र गोशाळेच्या परिसरातील जंगलाला कायम लागणारा वणवा, शासनाकडे अडकलेले २५ लाख रुपयांचे अनुदान, दानशूरांनी फिरवलेली पाठ यामुळे सध्या या गायींचा सांभाळ करणारे कोकरे यांच्यासाठी आव्हान बनले आहे. www.konkantoday.com