दापोलीत गाडीमध्येच वृद्धाचा मृत्यू
दापोली शहरातील आसराचे पूल जवळील डॉ. आंबेडकर चौक येथे ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना ३ मार्च रोजी घडली.मकरंद अच्युत भावे असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबतची खबर पूजा प्रसाद साखळकर (४५, जालगाव लष्करवाडी) यांनी दिली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा साखळकर या गजानन महाराज मठातून घरी जात होत्या. त्यावेळी त्या दापोली आसराच्या पुलाजवळ डॉ. आंबेडकर चौकात त्यांना लाल रंगाची कार दिसली. ती कार मकरंद भावे यांचीच असल्याची खात्री झाल्यावर गाडी तेथे उभी का आहे हे पाहण्यासाठी त्या गाडीजवळ गेल्या.त्यांनी गाडीत पाहिले असता मकरंद भावे गाडीत ड्रायव्हर सीटच्या बाजूला असलेल्या सीटवर उताणे अवस्थेत झोपलेले दिसले.www.konkantoday.com