गुहागर तालुक्यातील* *अंजनवेल येथे लागलेल्या**आगीत दुकान भस्मसात, ५ लाखांचे नुकसान
_गुहागर तालुक्यातील अंजनवेल पुलाजवळ असणार्या शादाब आचरेकर यांच्या आईस्क्रिम, थंड पेय व कटलरीच्या दुकानाला आग लागली. या आगीत त्यांच्या दोन गाळ्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग लागल्यानंतर विक्री साहित्य वाचविण्याचा प्रयत्न करणार्या शादाब आचरेकर यांचे दोन्ही हातही भाजले आहेत. या आगीमध्ये सुमारे ५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.अंजनवेल पुलाजवळ शादाब आचरेकर यांचे दोन दुकानगाळे आहेत. एका गाळ्यात थंड पेय, आईस्क्रिम, कुरकुरे, वेफर्स, गोळ्या, बिस्किटे असे अन्य खाद्य पदार्थ व नेल पॉलीश, बांगड्या, टिकल्या आदी सौंदर्य प्रसाधने असतात तर दुसर्या गाळ्यात मोबाईल ऍक्सेसरीज व रिचार्ज, लहान खेळणी, वह्या, कोरे कागद, पेन असे नित्य उपयोगात येणारे शालेय साहित्य ते विक्रीसाठी उपलब्ध असते. तीन महिन्यापूर्वीच त्यांनी एक गाळा घेवून आपला व्यवसाय वाढवला होता.www.konkantoday.com