
पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांचा जिल्हा दौरा.
*रत्नागिरी, : राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 27 जुन रोजी सकाळी 8 वाजता वाशिष्ठी” मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रकल्पास सदिच्छा भेट (स्थळ : “वाशिष्ठी” दुग्ध प्रकल्प, पिंपळी खुर्द, काळकाई मंदिरासमोर, ता.चिपळूण.)सकाळी 8.30 वाजता चिपळूण येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 11 वाजता NCC भवनाचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : कुवारबाव ). दुपारी 12 वाजता शिरगांव जि.प.मराठी शाळा नुतनीकरण शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : जि.प.मराठी शाळा, शिरगांव) दुपारी 1.30 वाजता विद्यार्थी दशा आणि दिशा” कार्यक्रमास उपस्थिती ( स्थळ : पटवर्धन हायस्कूल ) दुपारी 2.30 वाजता टिळक आळी शतक महोत्सव गणेशोत्सव-२०२५ : जिल्हा अजिक्यपद कॅरम स्पर्धा उद्घाटन समारंभास उपस्थिती ( स्थळ : भगिनी मंडळ हॉल, टिळक आळी ) दुपारी 2.45 वाजता डिजीटल इंडिया भुमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत अधिकार अभिलेख संगणकीकरण करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यासाठी लॅपटॉप व प्रिंटर यांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण कार्यक्रमास उपस्थिती. (जिल्हाधिकारी यांचे सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय ) दुपारी 3 वाजता MSSIDC व SICOM यांच्यामार्फत भरण्यात येणान्या कंत्राटी पदभरतीबाबत (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 3.15 वाजता RGPPL पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीस उपस्थिती (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय )दुपारी 4 वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेत होणाऱ्या बौध्द विहार संदर्भात आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 4.30 वाजता जे.एस.डब्ल्यू. व कॉफिडन्स गॅस बाबत बैठक
(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) सायंकाळी 5 वाजता सांडेलागवण गावातील भूसंपादनाबाबत (रेवस-रेड्डी महामार्ग) बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) सायंकाळी 5.30 वाजता रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक/बागायतदार यांच्या अडीअडचणीसंदर्भात बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) सायंकाळी 6 वाजता ट्रक टर्मिनल च्या अडीअडचणीसंदर्भात बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय ) सायंकाळी 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव.
शनिवार दि. 28 जून रोजी सकाळी 10.30 वाजता विद्यार्थी – दशा आणि दिशा” कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : सौ. गोदलाई जांभेकर विद्यालय ) दुपारी 12 वाजता शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठक (स्थळ : देसाई बैंक्वेट, हॉटेल विवेक, माळनाका ) दुपारी 2 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कुडाळ, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण.