
उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी दाखल
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी दाखल झाले आहेत.लोकसभा निवडणुका आणि आचारसंहिता जाहीर व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यावर आहे. पण तरीही महाविकास आघाडीचा काही जागांवर तिढा अजूनही कायम आहे. या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वत: शरद पवार यांच्या भेटीला गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अंतिम टप्प्यात असलेल्या जागावाटपावर चर्चा करणं आणि दोन जागांबाबत जो तिढा कायम आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेच्या 23 मतदारसंघांची यादी आहे. ठाकरे गट 23 मतदारसंघांवर ठाम आहेत. यापैकी एक ते दोन जागा त्यांची मित्र पक्षाला सोडण्याची तयारी आहे. त्यामुळे ठाकरे गट 20 ते 22 जागांवर निवडणूक लढवू शकतं.www.konkantoday.com