लांजा सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुर येथे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांची घेतली भेट
लांजा सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुर येथे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांची भेट घेतली. कमी केलेल्या गाय व म्हैशीच्या दूध दराबाबत चर्चा केली. तसेच गाय व म्हैशीचा दूध दर वाढवून मिळण्याबाबत निवेदन दिले.कोल्हापूर येथील गोकुळ दूध संस्थेने गाई व म्हैशीचा दुधाचा दर कमी केला आहे. या पार्श्वभूमीवर लांजा सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चेअरमन अरुण डोंगळे यांची भेट घेऊन कोकणातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली. बाजारात गाय व म्हैस यांना लागणारा चारा खाद्याचे दर भरपूर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला दूध व्यवसाय परवडणारा नाही. बाजारात पत्री पेंड १६०० प्रतिपोते, खाद्य १५०० व भुसा १२५०, सरकी पेंड १४०० प्रतिपोते असे दर आहेत. त्यामुळे आपण दुधाला जो दर दिला आहे तो उत्पादकांना परवडणारा नाही. कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता कोकणामध्ये या घडीला महिन्यापासून ते जूनपर्यंत ओला चारा मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता आपण यापूर्वी गाय व म्हैस दुधाला जो दर देत होता, तोच दर यापुढे द्यावा, अशी मागणी करण्यात आली.www.konkantoday.com