महिलांची मोफत आरोग्य तपासणी कॅम्प

We Care…स्त्री म्हणजे पूर्ण कुटुंब ,स्त्री म्हणजे आधार,स्त्री म्हणजे कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेणारी महत्वाची व्यक्ती.गरीब असो किंवा श्रीमंत,कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो स्त्रियांना स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही.स्त्रीचे सुरक्षित आरोग्य म्हणजे संपूर्ण कुटुंब सुरक्षित !! आजच्या धावपळीच्या जगात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष न देणारी स्त्री स्वतःला एका मोठया संकटात लोटत आहे.अशा परिस्थितीत तिच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी राहते.जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 8 मार्च 2024 रोजी उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित करत आहे ” महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी कॅम्प”आपल्या सर्वांची जबाबदारी ठरते या कॅम्पचा लाभ आपल्या कुटुंबातील,आपल्या राहत्या परिसरातील,आपल्या कामाच्या ठिकाणी असणाऱ्या ,आपल्या ओळखीच्या, प्रत्येक स्त्रीला या कॅम्प ची माहिती देणे आणि तिला सहभाग घेण्यासाठी सहकार्य करणे आता आपली सर्वांची जबाबदारी आहे.चला तर मग येत्या 8 मार्च 2024 ला आयोजित कॅम्पची माहिती देऊ आपल्या महिला भगिनींना.”स्त्री चे सुरक्षित आरोग्य म्हणजेच आपल्या कुटुंबाचे सुरक्षित भविष्य “!! ” महिलांची मोफत आरोग्य तपासणी कॅम्प ” कॅम्पची वैशिष्ट्ये विशेष तज्ञ डॉक्टर कडून तपासणी,दुर्धर आजाराविषयी समुपदेशन,नेत्र तपासणी,रक्त तपासणी,मोफत औषध,मोफत चष्मा वाटप…www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button