महाशिवरात्री निमित्त चिपळुणात ११ फूटी शिवलिंगाचे दर्शन**‘ब्रह्माकुमारीज’ केंद्राचा उपक्रम
चिपळूण :: ‘ब्रह्माकुमारीज’ यांच्या चिपळूण शहरातील मुरादपूर येथील साई मंदिराजवळच्या भाग्योदय भवन केंद्रात महाशिवरात्री निमित्त भाविकांना ११ फूटी शिवलिंगाचे दर्शन घेता येणार आहे. या शिवलिंगाचे दर्शन ७, ८ व ९ मार्च रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत घेता येणार आहे. शिवलिंगाचे उद्घाटन ७ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे. भारतीय धार्मिक परंपरेनुसार महाशिवरात्री हा सण मोठया उत्साहाने संपन्न होत असतो. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत विविध ठिकाणी ज्योतिस्वरूप परमपिता परमात्मा शिव यांचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत व्रत जागरण आणि उपवास यांचा अर्थ काय आहे? शिवाच्या पिंडीवर अर्ध प्रदक्षिणा का घालतात? बेल पत्र का वाहतात? लोटी का दाखवली जाते? धोतऱ्याचे फुल का वाहतात? नंदीबैल का दाखवतात? आदी प्रश्नांची उत्तरेही यावेळी भाविकांना मिळू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी मो. ९८२२४३८८४२ येथे संपर्क साधावा.www.konkantoday.com