सेंट जॉर्ज रुग्णालयात कर्मचारी असलेल्या एका व्यक्तीवर अपघातानंतर वेळेवर उपचार न झाल्याने मृत्यू,2 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयात कर्मचारी असलेल्या एका व्यक्तीवर अपघातानंतर वेळेवर उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.अनिश चौहान (वय 35) यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, वेळीच उपचार मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच सर्व कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.सेंट जॉर्ज रुग्णालय घटनेत तातडीने कारवाई करण्यात आली आहे. 2 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आज गुरुवारी दुपारी 12 वाजता विधीमंडळात बैठक घेणार आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button