मंगळवार पासून ४२ हजार कंत्राटी कामगार बेमुदत आंदोलन

वीज कंत्राटी कामगार कृती समितीने महाराष्ट्र शासन व वीज वितरण, पारेषण तसेच निर्मिती कंपनी प्रशासनाला आंदोलनाची नोटीस देऊनही शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवार (ता.५) पासून ४२ हजार कंत्राटी कामगार बेमुदत आंदोलन करणार आहेत. या आधी ४८ तासांच्या काम बंद आंदोलनाचा परिणाम होऊन महावितरणच्या महसुलास खीळ बसली होती. वीज निर्मितीसाठी अडथळा झाला होता. आता ऐन उन्हाळ्यात हे कामगार आंदोलन करणार असल्याने नागरिकांना याची झळ बसणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button