चिपळुणात दुचाकी अपघातात तरुण हॉटेल व्यवसायिकाचा मृत्यू
दुचाकी लोखंडी रेलिंगला आदळून झालेल्या अपघातात शहरातील अयोध्या हॉटलचे ओंकार पाकळे या २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरच्या कामथे परिसरात एका अवघड वळणावर घडली. या अपघाताची चिपळूण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.ओंकार राजेश पाकळे (२७, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद महादेव रंगनाथ शिंदे (५४, चिपळूण) यांनी दिली. ओंकार हा दुचाकीने चिपळूणहून तालुक्यातील निवळगावच्या दिशेने रविवारी निघाला होता. असे असताना मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करतेवेळी तो कामथे घाटातील वांगीपूल परिसरातील एका अवघड वळणावर आला असता त्याची दुचाकी महामार्गावरच्या लोखंडी रेलिंगवर जोरदार आदळली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले. www.konkantoday.com