
खेड लोक अदालतमध्ये ३५ लाख रुपयांची सामोपचाराने तडजोड
रत्नागिरी, : खेड येथे झालेल्या लोक अदालतीमध्ये एकूण ९८ प्रकरणांमध्ये ३५ लाखांची तडजोडीने निकाल झाला. या लोक अदालतमध्ये ७४ प्रलंबित दिवाणी व फौजदारी तसेच वादपूर्व २४ प्रकरणे तडजोडीने सामंजस्याने निकाली निघाली. त्यामुळे पक्षकारांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय टळला, अशी माहिती, जिल्हा न्यायाधीश डॉ सुधीर देशपांडे यांनी तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून दिली. या लोकअदालतमध्ये न्यायाधीश व वकीलांचे पाच पॅनल चे नियोजन करण्यात आलेले होते. या लोकअदालतीचे कामकाज जिल्हा न्यायाधीश डॉ. देशपांडे, दिवाणी न्यायाधीश एन. एस. निसळ, एम. व्ही. तोकले, एस.एम.चव्हाण, मनिषा पाटील तसेच पॅनल विधीज्ञ सतीश नाईक, पूनम जाधव, संगिता बापट, स्वप्नील खोपकर, सिध्दी खेडेकर यांनी पाहिले. त्याचप्रमाणे वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनीही लोकअदालत यशस्वी करण्याकामी तालुका विधी सेवा समिती यांना मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डॉ. देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले.www.konkantoday.com