खेड पोलिसांच्या सतर्कतेने त्या दोन मुली पालकांच्या ताब्यात

खेड शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकणार्‍या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. शोधमोहिमेनंतर मडगाव येथून दोन्ही अल्पवयीन शाळकरी मुलींना ताब्यात घेवून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. खेड पोलिसांच्या तत्परतेने सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकणार्‍या १६ व १३ वयोगटातील दोन शाळकरी मुली घरी परतल्या नव्हत्या. या दोघींचा बाजारपेठेसह रेल्वेस्थानक, बसस्थानक, भरणे, खवटी व आजुबाजूच्या परिसरात शोध घेवूनही थांगपत्ता लागला नव्हता. अखेर एका मुलीच्या पालकाने अपहरण झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंदवली होती.पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी ही बाब गांभीर्याने घेत तपासाला गती दिली. या दोन्ही मुली गोवा बघण्यासाठी रेल्वेगाडीने मडगाव येथे गेल्या होत्या. पोलिसांच्या सतर्कतेने या दोन्ही मुलींना तेथून ताब्यात घेत त्यांचे समूपदेशन करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button