कौटुंबिक वातावरणात संगोपन व विकास घडवून आणण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना
अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील मुलांमुलींचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व विकास घडवून आणण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबवली जाते योजनेंतर्गत प्रत्येक बालकाला दरमहा २२५० रुपये देण्यात येतात. हे पैसे बालकाच्या खात्यात थेट जमा होतात.या योजनेंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलामुलींना थेट पर्यायी कुटुंबात संगोपनाकरिता ठेवता येते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी अथवा स्वयंसेवी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते हे गृहचौकशी करून संबंधित बालकल्याण समितीला अहवाल सादर करतात. त्या अहवालाच्या आधारे बालकल्याण समितीकडून दाखल आदेश घेवून लाभार्थ्यांस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत बालसंगोपन या योजनेचा लाभ देण्यात येतो. एकाच कुटुंबातील दोनच बालकाना लाभ देण्यात येतो. अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी बालके दत्तक देणे शक्य नाही. या योजनेचा लाभ कुटुंबातील तणाव, तंटे, वादविवाद, न्यायालयीन वाद अशा सारख्या कौटुंबिक संकटात बाधित, कुष्ठरुग्ण पालकांची बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, तुरुंगात असलेल्या पालकांची बालके, एच. आय. व्ही. ग्रस्त पालकांची बालके, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने बाधित पालकांची बालके.,तीव्र मतीमंद , एच. आय. व्ही. किंवा कॅन्सरग्रस्त, चाळीस टक्केपेक्षा अधिक अपंगत्व असलेली, अंध, दिव्यांग, भिक्षा मागणारी, पोक्सोमधील पीडित, तीव्र कुपोषित, दुर्धर आजार असलेली बालके आदीना मिळू शकतो.www.konkantoday.com