एसटी चालकाच्या आसनाला चक्क एका दगडाचा आधार,देवरूख आगारातील प्रकार
राज्य परिवहन मंडळाच्या चालकाच्या आसनाला दगडाचा आधार दिल्याचे पहायला मिळताच प्रवाशांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा प्रकार पहायला मिळत असून देवरूख आगाराबाबत प्रवासीवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. काही महिन्यापूर्वी देवरूख आगारातील एका चालकाने सोशल मिडियावर पोस्ट करीत येथील आगारप्रमुखांविरूद्ध आवाज उठविला होता.मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वरहून चाळके वाडीसाठी सुटणारी देवरूख आगाराची बस क्रमांक एमएच २०/बीएल-२५ संगमेश्वर फलाटावर लागली होती. प्रवासी गाडीत बसण्यासाठी जात असताना काही प्रवाशांचे चालकाच्या केबिनमध्ये लक्ष गेले आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला.चालकाच्या आसनाला चक्क एका दगडाचा आधार दिलेला पहायला मिळताच त्याने इतर प्रवाशांना याची कल्पना दिली. हा सारा प्रकार पाहताच प्रवाशांत संताप पसरला आहे याबाबत वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे www.konkantoday.com