
रत्नागिरी टॅलेंट सर्च परीक्षेत मधुरा पाटील प्रथम
माजी विद्यार्थी मंडळ,शासकीय अध्या, महाविद्यालय व शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच घेण्यात आलेल्या रत्नागिरी टॅलेंट सर्च परीक्षेत पटवर्धन हायस्कूलची कु. मधुरा संजय पाटील प्रथम क्रमांक मिळवून यशस्वी झाली.द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे कु. आर्य धनंजय दांडेकर (फाटक हायस्कूल, रत्नागिरी) व कु. आदित्य महेश दामले (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी) यांना मिळाला आहे. तसेच उत्तेजनार्थ कु. अन्वयी नितीन चव्हाण (राधाबाई गोपाळ जागुष्टे, हायस्कूल कुवारबांव रत्नागिरी) हिने यश मिळवले. या परीक्षेसाठी श्रीम. राजश्री देशपांडे, प्राचार्या शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी यांचे सहकार्याने तसेच माजी विद्यार्थी मंडळ, शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरीचे अध्यक्ष रविंद्र इनामदार कार्यवाह गणपती एडवी, खजिनदार विजय वाघमारे व सल्लागार विनायक हातखंबकर यांनी मिळून या परिक्षेचे आयोजन केले होते. www.konkantoday.com