रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासह शिंदे गटाचा २३ जागांवर उदय सामंत यांचा दावा
गतवेळी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या. आगामी निवडणुकीतही त्याच जागा हव्या असल्याचे मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे दरम्यान, महायुतीत मुख्यमंत्र्यांकडे जागा वाटपाचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असून त्यांनी घेतलेला निर्णय शिवसेनेसाठी शिंदे गटासाठी अंतिम राहणार असल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वातावरणापासून राजकीय पक्षात जागा वाटपावरून चढाओढ सुरू झाली आहे. महायुतीत भाजप मोठा पक्ष असल्याने सर्वाधिक जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपने दावा केला. गोव्याचे मुख्यमंत्रीही या मतदारसंघात आले होते. शिवसेनेचे इच्छुकांकडून याला विरोध होतो आहे. मंत्री सामंत यांचे बंधु किरण (भैय्या)सामंत येथे निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. महायुतीत त्यामुळे धुसफूस वाढली आहे. मंत्री सामंत यावर खुलासा केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा शिवसेने जिंकली आहे. मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हीच जागा लढण्याची आमची इच्छा आहे. इतकेच नव्हे तर शिवसेनेने मागील लोकसभा निवडणुकीत २३ जागा लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत त्याच जागा आम्ही लढणार आहोत, असे सामंत म्हणाले. मुख्यमंत्र्यांना जागावाटपाचा निर्णय घेण्याचे सर्वाधिक अधिकार दिले आहेत. www.konkantoday.com