
रत्नागिरी येथील एसटी वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रिशियन कर्मचार्याच्या पायावरुन एसटीचे चाक गेल्याने गंभिर जखमी
रत्नागिरी येथील विभागीय कार्यशाळा टीआरपी येथील एसटी वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रिशियन कर्मचार्याच्या पायावरुन एसटीचे चाक गेल्याने तो गंभिर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.विलास शंकर चव्हाण (45,रा.संगमेश्वर, रत्नागिरी) असे जखमी इलेक्ट्रिशियनचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी तो एसटी वर्कशॉपमध्ये एसटीच्या वायरिंगचे काम करत होता. त्याचवेळी एक चालक तेथील ओपन चॅसी असलेली एसटी पूणे येथे नुतनीकरण करण्यासाठी घेउन वर्कशॉपबाहेर जात होता. त्याचे वर्कशॉपमधील कॉर्नरला एसटीचे काम करत असलेल्या विलासकडे लक्ष न गेल्याने एसटीचे चाक विलासच्या उजव्या पायावरुन गेले. यात विलासच्या पायाला गंभिर इजा झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. www.konkantoday.com