मिर्या-नागपूर* *महामार्गादरम्यान येणार्या**कुवारबांव उड्डाणपुलाचे काम पुन्हा रखडणार
मिर्या-नागपूर महामार्गादरम्यान येणार्या कुवारबांव बाजारपेठेचा प्र्रश्न पुढील वर्षभरात मार्गी लागेल की नाही, अशी शंका आता इथल्या व्यापारी व नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याआधी निदान सर्व्हिस रोड आणि दोन्ही बाजूकडील गटारे पूर्ण होणे गरजेचे आहे. अन्यथा या पावसाळ्यात कुवारबाव परिसरात पाणीच पाणी पहायला मिळेल, असे बोलले जात आहे.कुवारबाव परिसरातील कामाला वेग आला आहे. मात्र सध्या या परिसरातील सर्व्हिस रोड आणि पावसाच्या पाण्यासाठी दुतर्फा गटारे बांधण्यासाठी कंत्राटदाराला सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या हे काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे. कुवारबावच्या उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव अद्याप वरिष्ठ पातळीवर मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहेत. www.konkantoday.com