
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक गुरुवारी (दि. २९) दिल्लीतील पक्ष कार्यालयात झाली. पक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. मध्यरात्री तीन वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची नावे निश्चित केल्याची औपचारिक घोषणा आज (दि. २ मार्च) झाली. पहिल्या यादीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, स्पीकर यांची नावे आहेत१९५ पैकी जणांच्या यादीत २ माजी मुख्यमंत्र्यांची नावे आहेत, २८ महिला तर ४७ तरुण असतील अशी माहिती देखील तावडे यांनी दिली आहे. त्याचबरोबर एकूण ३४ मंत्री निवडणूकीच्या रिंगणात असतील. अनुसुचित जमातीमधून १८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहेwww.konkantoday.com