
नियोजनाच्या नावाने बोंबाबोंब पाणी व गॅस पाईपच्या कामामुळे रस्ते झाले धुळीचे, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
रत्नागिरी शहराजवळील राजापूरकर कॉलनीतील संपूर्ण रस्ता मातीमय झाला असून रस्त्याच्या आजू बाजूच्या घरांत धूळी माती थर जमा झाले असून येथिल नागरीकांना दम्या सारखे श्वसनाचे त्रास सुरू झाले आहेत . शिरगांव ग्राम पंचायतीने पाण्याची नविन पाईप लईन टाकण्यासाठी पहिल्यांदा जुन्या पाईप फॅक्टरी पासून ओसवाल नगर पर्यन्त संपूर्ण रस्ता जेसीबी च्या साह्याने खोदण्यात आला हे काम पूर्ण झाल्यावर अशोका गॅस कंपनीने याच मार्गावर जेसीबी पुन्हा रस्ता खोदला आहे हे काम पूर्ण होत आले असताना . ओसवाल नगर जवळील चोळीच्या पऱ्या वरती पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्या मुळे ओसवाल नगर पासून संपूर्ण वाहातूक राजापूरकर कॉलनी येथून चालू आहे . दोन वेळा रस्ता खोदून त्यावरती डांबरी करण तर सोडाच सांधे पाणीही मारले जात नाही . त्यामुळे येथिल नागरिकाना श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत तसेच आजू बाजूच्या घरांत मातीचा थर जमा झाला आहे तरी शिरगांव ग्राम पंचायत आणि अशोका गॅस कंपनी यानी नागरीकांच्या आरोग्याशी खेळण्या पेक्षा यावर विचार करणे गरजेचे आहेwww.konkantoday.com