नाणीजक्षेत्री गजानन महाराज प्रगटदिन, भव्य शोभायात्रा

नाणीजक्षेत्री येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे उद्या (3 मार्च 2024) संतशिरोमणी गजानन महाराज प्रगट दिनी व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज जयंती दिनी भव्य व नेत्रदीपक शोभायात्रा काढण्यात येणार आहे.आज वारी उत्सवास सुरूवात झाली. याग व निमंत्रण मिरवणुकांनी सारा सुंदरगड भक्तीमय झाला आहे.आज या सोहळ्याची सुरुवात मंत्रघोषाने झाली. सारे वातावरण भक्तीमय झाले. सारा सुंदरगड भाविकांनी फुलून गेला आहे. उद्या त्यात आणखी भर पडेल. आज धार्मिक विधींबरोबर श्री महामृत्युंजय सप्तचरजीवी याग व अन्नदान विधी सुरू होईल. त्यानंतर दुपारी ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष करीत मिरवणुकीने जाऊन देवदेवतांना सोहळ्याची निमंत्रणे देण्यात येणार आहेत. येथील श्री वरद चतामणी, प्रभू श्री राम, लक्ष्मण, सीता मंदिर, मुख्य श्री गजानन महाराज मंदिर, नाथांचे माहेर मंदिर येथे या मिरवणुका काढून निमंत्रणे दिली. या मिरवणुकांची जबाबदारी रत्नागिरी, धाराशिव, जालना, नागपूर जिल्हा समित्यांवर होती.उद्या सकाळी नऊपासून संतशिरोमणी गजानन महाराज व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज यांची शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत महाराष्ट्रातील खेड्यांत पिढ्यापिढ्या सुरू असलेल्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. अनेक लोककला यामध्ये सादर केल्या जाणार आहेतwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button