चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील उड्डाणपुलाच्या पिलरवर बसवलेले सर्वच गर्डर तोडले
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील उड्डाणपुलाच्या पिलरवर बसवलेले सर्वच गर्डर तोडण्यात आले आहेत.येथील जागा स्वच्छ करून नव्याने कामाची तयारी सुरू केली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. सद्यःस्थितीत प्राथमिक तयारी सुरू आहे. नव्या डिझाईननुसार उड्डाणपुलाच्या कामाचे नियोजन केले जात आहे.आता नव्या डिझाईननुसार काम सुरू होणार आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामाचे गर्डर ऑक्टोबर २०२३ मध्ये कोसळून झालेल्या अपघातामुळे या टप्प्यातील कामाचे वेळापत्रक दीर्घकाळासाठी पुढे गेले आहे. आता नव्या डिझाईननुसार कामाची प्रतीक्षा आहे.www.konkantoday.com