चिपळूण राड्याप्रकरणी भाजपा राणे समर्थकाला अटक
मुंबई गोवा महामार्गावर पाग नाका येथे माजी खासदार निलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये १६ रोजी झालेल्या राड्याप्रकरणी ४०० जणांवर गुन्हा दाखल आहे.मात्र १५ दिवसात केवळ ११ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. यात राणे समर्थकांपैकी एकासही अटक झाली नव्हती. अशातच शुक्रवारी सायंकाळी राणे समर्थक संदेश भालेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे.www.konkantoday.com