
गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते डॉ. प्रमोद सावंत रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर
गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते यांचा रद्द झालेला रत्नागिरी दौरा नव्याने आयोजित करण्यात आला आहे. २ आणि ३ मार्च रोजी डॉ. प्रमोद सावंत रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.२ मार्च शनिवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे रात्रौ ११. ३० वाजता रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन होईल. यानंतर ते थेट गणपतीपुळे येथे प्रस्थान करतील. या ठिकाणी त्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.३ मार्च रोजी सकाळी ८ ये ९ या वेळेत ते गणपतीपुळे मंदिरामध्ये श्री गणरायाचे दर्शन घेतील आणि त्यानंतर रत्नागिरी शहराकडे प्रस्थान करतील. सकाळी ९.४५ ते १०.१५ या वेळेत रत्नागिरी विशेष कारागृहातील स्वा. सावरकर कोठडीला ते भेट देणार आहेत. यानंतर ते पक्षाच्या दिवार लेखन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. १०.३० वाजता ते विचार परीवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृह येथे भाजपचे बूथ स्तरीय कार्यकर्ता महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या महासंमेलनाला डॉ. प्रमोद सावंत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानंतर दुपारी १२.३० वाजता रेस्ट हाऊस येथे दक्षिण भाजप च्या कोअर कमिटीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर ते लांजा येथे प्रयाण करणार आहेत. दुपारी ३.१५ वा. राजापूर कुणबी सहकारी पतसंस्थेला भेट देऊन ते सावंतवाडीच्या दिशेने प्रयाण करणार आहेत.www.konkantoday.com