कोकण रेल्वे मार्गावर लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी येथील बोगद्याजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
कोकण रेल्वे मार्गावर लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी येथील बोगद्याजवळ एका अनोळखी पुरुष व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी आढळून आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी २९ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्याने वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी बोगद्यातून मांडवी एक्सप्रेस मुंबईकडे निघून गेल्यानंतर आडवली रेल्वे स्थानकातील ट्रॅकमन प्रदीप जाधव हे रेल्वे रुळावरून पेट्रोलिंग करत असताना त्यांना हा मृतदेह दिसला. त्यांनी याबाबतची माहिती वेरवली पोलीस पाटलांना दिल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती लांजा पोलिसांना दिली .त्यानंतर लांजा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला .हा मृतदेह सुमारे ४० वर्षे पुरुषाचा असून त्याची ओळख पटलेली नाही. हा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असून रेल्वेच्या धडकेने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. www.konkantoday.com