उद्घाटनानंतर 14 महिन्यातच ‘समृद्धी’वर पुलाला जीवघेणा खड्डा! बांधकामाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
नागपूर ते मुंबई दरम्यानचे सुमारे 800 किलोमीटरचे अंतर अवघ्या दहा तासांत कापणाऱ्या ‘समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.परंतु, एवढ्या कमी कालावधीत रस्ते अपघात आणि अनेकांचे बळी गेले .यातच आता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगावनजीक पुलाला खड्डा पडला आहे. महामार्गाजवळून शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्याच्या आराखड्यात व बांधकामात त्रुटी असल्याची तक्रार करण्यात येत होतीनागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग 55 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. मात्र, उद्घाटनानंतर काही महिन्यातच महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.www.konkantoday.com