
केवळ आरक्षण असेल तरच रेल्वे स्थानकात प्रवेश;तपासणी नंतरच स्थानकात सोडणार:-कोकण रेल्वे महामंडळ
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत.उद्या पासून अनेकांचा परतीचा प्रवास सुरु होईल.मात्र ज्या प्रवाश्यांकडे आरक्षण आहे अशाच प्रवाश्यानी स्थानकात यावे .आरक्षण नसलेल्या प्रवाश्यांना स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही असा कोकण रेल्वे ने म्हटले आहे .
मुंबईतून कोकणात येणाऱ्या प्रवाश्यांकरिता कोकण रेल्वेने या वर्षी मोठे नियोजन केले आहे.225 हुन अधिक फेऱ्यांच्या माध्यमातून कोकण रेल्वे कोकणी गणेश भक्तांना कोकणात आणत आहे .गणेश भक्ताच्या परतीच्या प्रवासाचे हि कोकण रेल्वेने मोठं नियोजन केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठेही गर्दी होऊ नये या करिता कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात बॅरेकेटिंग करण्यात आले आहे.आरोग्य विभागाच्या माध्यमातून येथे येणाऱ्या प्रवाश्याची तपासणी केली जात आहे नोंद घेतली जात आहे.आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाश्यांच्या गर्दी चे नियंत्रण केले जात आहे.
आता दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होईल. यावेळी केवळ आरक्षण असलेल्या प्रवाश्यांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार आहे. ज्याच्या कडे आरक्षण नाही अशा मंडळींनी स्थानकावर गर्दी करू नये त्यांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार नाही आहे.आरक्षण असलेल्या मंडळी नी हि तपासणी करीता आपल्या ट्रेनच्या निर्धारित वेळेपूर्वीच उपस्थित रहावे असे आवाहन कोकण रेल्वे ने केले आहे.
www.konkantoday.com