
आज आणि उद्या दापोली येथे होणार पर्यावरणाचा जागर* *पर्यावरण स्नेहींच्या दोन दिवसीय सहविचार सभेचे आयोजन
दापोली०२:- आज दोन मार्च आणि उद्या तीन मार्च रोजी दापोली तालुक्यातील जालगाव येथील आम्रपाली होम स्टे येथे पर्यावरण स्नेही कार्यकर्त्यांच्या दोन दिवसीय सहविचार सभेचे आयोजन निवेदिता प्रतिष्ठान दापोली, टेलस ऑर्गनायझेशन पुणे, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी पुणे आणि महाएनजीओ पुणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. या दोन दिवसीय सभेमध्ये निसर्गाला आरक्षण मागण्यांबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.त्या बाबतचे निवेदन शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशांत परांजपे यांनी दिली. या सहविचार सभेमध्ये प्लास्टीक कचरा मुक्त शाळा.विषयी प्रस्ताव मांडणी. पाणी नियोजन सांघिक लढा.मानसिक बदल घडवून आणणयासाठी संघटित कृती आराखडा.वणवा मुक्त गाव संकल्पना. कचरामुक्त पर्यटन संकुल संकल्पना. कचरा मुक्त मी संकल्पना.आदी निसर्ग संवर्धन संदर्भात निर्णायक चर्चा होणार आहे. सहविचारसभे करिता मुंबई,पुणे,रत्नागिरी, देवरूख,चिपळूण ,गुहागर,दापोली ,महाड आदी ठिकाणांहून पर्यावरण स्नेही कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.www.konkantoday.com