विद्यापीठाच्या गलथान कारभाराच्या विरोधात**मुंबई विद्यापीठ उपकेंद्राबाहेर उपोषण आंदोलन
मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभाराच्या विरोधात वारंवार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने निवेदने देऊन चर्चा करण्यात आली होती. परीक्षा होऊन अनेक महिने उलटून गेल्यावरही विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित असणे, निकालात घोळ, त्याद्वारे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यापीठाने दिली नाहीत. त्याविरोधात अभाविप रत्नागिरी शाखेतर्फे विद्यापीठ उपकेंद्र परिसराबाहेर उपोषण आंदोलन करण्यात आले.आंदोलनावेळी उपकेंद्राद्वारे मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून देण्यात आला. चर्चेतून सोमवारी या विषयात बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करू, असा सकारत्मक निर्णय आल्याने हे आंदोलन थांबवण्यात आले.www.konkantoday.com