
लाटवण-दापोली घाटात मांजराच्या खवल्यांची तस्करी करणार्या तिघांना अटक
मंडणगड : तालुक्यातील लाटवण-दापोली रस्त्यावरील घाटात खवले मांजराच्या तस्करीसाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खेड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हर्षद हिंगे व त्यांचे पथक तसेच मंडणगड पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
या घाटात एका दुचाकीवरून तीन व्यक्ती संशयितरित्या जाताना पोलिसांना आढळून आल्या. त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीत खवले मांजराची 4 किलो 372 ग्रॅम वजनाची खवले सापडली. याचवेळी आणखी एक व्यक्ती चारचाकी वाहनातून आली. मात्र, पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत त्या व्यक्तीने वाहनासह पलायन केले. पोलिसांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरधाव वेगाने तो निघून गेला. या प्रकरणी तिघांना मोटारसायकलसह ताब्यात घेऊन मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.