स्वस्त वाळूचा गरीबांपेक्षा दलालांनाच अधिक फायदा,**शासनाची ६७० रुपये ब्रासची वाळू ५ पटीने महागली
शासनाने गरीबांना ६७० रुपयांत वाळू देण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन ते तीन महिन्यातच हा प्रयत्न फसला असून हीच वाळू आता शासनाच्या डेपोवर ३ हजार ५७० रुपये ब्रासने मिळणार आहे. मुळातच स्वस्त वाळूचा गरीबांपेक्षा दलालांनाच अधिक फायदा झाला. नव्या दराची अंमलबजावणी २ मार्चपासून होणार असल्याचे वृत्त आहे. तसेच पारंपारिक हातपाटीलाही परवानगी मिळण्याची शक्यता आहे.गेल्या कित्येक वर्षापासून वाळूचा विषय गाजत आहे. कधी जादा दराने विक्री तर कधी चोरट्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्खनन अशा अनेक बाबी सातत्याने पुढे येत आहेत. त्यातच अनेकदा वाळूवॉर झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत हाताबाहेर जाणारी सर्वच ठिकाणची परिस्थिती लक्षात घेता काही महिन्यांपूर्वी शासनाने गरीबांना केवळ ६७० रुपयांत वाळू देण्याची घोषणा केली. त्यानुसार राज्यात शेकडो डेपो सुरू करण्यात आले त्यातील काही डेपो रत्नागिरी जिल्ह्यात असून चिपळुणात दोन डेपो आहेत.आता नवे वाळू धोरण आले आहे. त्यानुसार वाळूचा दर ६७० रुपये ब्रासवरून चक्क ३ हजार ५७० रुपये ब्रास केला आहे. याची अंमलबजावणी २ मार्चपासून होणार आहे. ज्यांनी यापूर्वी वाळूसाठी बुकींग केले आहे त्यांनाच जुन्या दराने वाळू मिळणार आहे.www.konkantoday.com