सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने निरीक्षक नेमले नाहीत ,ही जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता, किरण सामंत यांचे पारडे जड
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील २३ जागांसाठी निरिक्षक नेमून मित्रपक्षांसमोर गुगली टाकली आहे. एकीकडे भाजपकडून जास्तीत जास्त जागा लढण्याची तयारी असल्याच्या चर्चा सुरू असताना मागील वेळी जिंकलेल्या २३ जागांसाठीचे निरीक्षक नेमल्याने जागावाटपच्या गणिताचा नेमका फॉर्म्युला काय ?भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली होती. राज्यातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी लवकरात लवकर जागावाटपाचा तिढा सुटणे आवश्यक असल्याची भूमिका त्यात मांडण्यात आली होती. मिशन ३७० साठी भाजपने महाराष्ट्रातून मित्रपक्षांसह ४२ हुन अधिक जागा काबीज करायच्या आहेत.यातच भाजपकडून नेमण्यात आलेल्या निरिक्षकांमध्ये बारामती, रत्नागिरी-सिंधुदूर्ग आणि नाशिक या लोकसभा मतदारसंघात निरिक्षक नेमण्यात आले नाहीत. त्यामुळे बारातमीची जागा ही अजित पवार गटाला तर रत्नागिरी-सिंधुदूर्ग आणि नाशिक या जागा शिंदे गटाला सोडण्याची शक्यता आहे. या दोन्ही जागांसाठी शिंदे गट आग्रह असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची जागा शिंदे गटाकडे आल्यास किरण सामंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहेतर रायगडची जागा भाजपला मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या वेळी त्यांनी रायगड मधून लोकसभा जिंकली होती. यातच आता पुन्हा त्याठिकाणी उमेदवारी देण्यात येणार आहे.www.konkantoday.com