सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे नमन महोत्सवाचे आयोजन
रत्नागिरी : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे नमन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात दिनांक 6 ते 8 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळत नमनाचे कार्यक्रम होणार आहेत. बुधवार, 6 मार्च रोजी झरेवाडी नाट्य नमन मंडळ, मंदरुळ, राजापूर बळीवंश कलामंच कांदिवली (पूर्व), मुंबई यांचे व श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ माभोळे, जाधववाडी, संगमेश्वर या नमन मंडळाची भजने होणार आहेत. गुरूवार दिनांक 7 मार्च रोजी श्री सिद्धिविनायक नाट्य नमन मंडळ मु.पो. मंदरुळ गणेशवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, नवलाईदेवी नमन मंडळ कुर्णे, पयडेवाडी, लांजा व नवविकास नमन मंडळ अबिटगाव, दत्तवाडी, चिपळूण यांची नमने होणार आहेत शुक्रवार 8 मार्च रोजी आई जीवदानी कला, फाऊंडेशन नाट्य नमन मंडळ वीर, चिपळूण याचे त्यानंतर रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ लयभारी, रत्नागिरी यांचे व साई श्रद्धा कलापथक कानसे ग्रुप चिखली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी या नमन मंडळाची नमने होणार आहेत, हा नमन महोत्सवासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.या सर्व कार्यक्रमाचा लाभ ध्यावा असे अवाहन विकास खारगे (भा.प्र.से.) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग व विभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.