वेळास येथेआठवडाभरात कासव महोत्सव घोषित होण्याची शक्यता
वेळास येथे यावर्षीच्या हंगामातील पहिले घरटे जानेवारीत संरक्षित करण्यात आले. वातावरणातील बदलांमुळे तब्बल दोन महिने उशिराने ऑलिव्ह रिडलेचे आगमन किनाऱ्यावर झाल्याने पिल्लांचा जन्मोत्सव हंगाम लांबणीवर गेला आहे. यावर्षी २६ घरटी हचेरीत संरक्षित करण्यात आली असून, आठवडाभरात कासव महोत्सव घोषित होण्याची शक्यता आहे. समुद्री कासवांचे संवर्धनाकरिता वेळास येथे दीड दशकापूर्वी सुरू झालेली सागरी कासव संवर्धन मोहीम तालुक्याच्या बहुआयामी विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आली आहे.या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या पर्यटनसंधींचा स्थानिकांसह तालुक्याने लाभ घेण्याची आवश्यकता आहे. याकरिता स्थानिक पातळीवरून सुरू असलेल्या प्रयत्नांना शासनाने पाठबळ देण्याची गरज आहे. २००६ ला तालुक्यातील जैवविविधतेने नटलेल्या वेळास या गावी कासव संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांमध्ये पुरेशी जागृती झाल्यावर स्थानिक ग्रामपंचायतीने वनविभाग व संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने या मोहिमेचे संचलन सुरू केले. त्यातून हजारो समुद्री कासवे समुद्रात विसावतातwww.konkantoday.com