
नाखरे येथील तो प्रकार देवदेवस्कीचा नव्हे तर तो आरोग्यासाठी केलेला विधी
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे परिसरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने बॅनर लावण्यात आले होते.मात्र बॅनरचा भाग तीन रस्ते म्हणजे त्रिकोण असल्याने एका इसमाने तब्येत बरी होण्यासाठी त्याच्या अंगावरून काढलेल्या वस्तू या बोर्डाच्या जवळ ठेवण्यात आल्यामुळे खळबळ निर्माण झाली होती. मात्र ही देव देवस्की व करणी नसून यात राजकारणाचा काही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. यामुळे संबंधित व्यक्तीच्या आरोग्य करिता केलेला विधी आहे, असे निष्पन्न झाल्याने गावातील राजकीय वातावरण थंड झाले, अन संशयकल्लोळ संपला.
सध्या राज्यामध्ये शिवसेनेमध्ये उभी फुट पडल्यामुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात बदलले आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या गावांमध्ये शिवसेनेने आम्ही सध्या कसे निष्ठावंत आहोत, याकरिता बॅनरबाजी करण्यात आलेले आहे, तशीच बॅनरबाजी नाखरे बौद्धवाडी फाट्यावर केलेली आहे, या ठिकाणी तीन रस्ते येतात. त्यामुळे अनेक भाविक लोक काही विधी या फाट्यावर करतात. तसाच प्रकार करण्यात आल्याचे उघडकीस आले हा प्रकार राजकीय हेतूने करण्यात आला की काय अशी शंका उपस्थित केली जात होती त्यावर आता पडदा पडला आहे
www.konkantoday.com