
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये कोणाला उभं राहायचं त्यानी ठरवावे. त्यांचा अडीच लाखांच्या मताने पराभव होणार -खासदार विनायक राऊत
भाजप अद्यापही ऐऱ्या गैऱ्याना जवळ करत आहे. त्यांना स्वतःच्या ताकदीवर विश्वास राहिलेला नाही. इतर पक्षातील लोकांना भाजप पक्षात घेऊन आपल्याच पक्षातील लोकांवर अन्याय करत आहे, अशी टीका शिवसेना (उबाठा) नेते, खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये कोणाला उभं राहायचं त्यानी ठरवावे. त्यांचा अडीच लाखांच्या मताने पराभव होणार याची मानसिकता ठेवावी, असा टोलाही राऊत यांनी लगावला. रत्नागिरी दौऱ्यावर असतान पत्रकारांशी झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते. विनायक राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी कोण विरोधक आहे, याचा विचार आम्ही करणार नाही. परंतु आम्ही निवडून येण्याची तयारी ठेवली आहे. नारायण राणे निवडणुकीला उभा राहावेच, तसे झाले तर आमचे काम अधिक सोपे होईल. भाजपला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ लढविताना स्वतःच्या ताकदीवर विश्वास राहिलेला नाही. पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभा उमेदवारी मिळणार, अशी चर्चा आहे. याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले, मुंडे परिवारावर भाजपने अन्याय केलेला आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या योगदानाचा भाजपला विसर पडलेला आहे. आता उमेदवारी देऊन स्व. मुंडे यांचाच अपमान भाजप करत आहे. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने फार काही नुकसान होईल असे वाटत नाही, नांदेडमध्ये काँग्रेसची ताकद दिसून येईल, असे राऊत म्हणाले. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल. तसेच गद्दारांची ना घर का ना घाट का, अशी स्थिती असल्याची देखील राऊत म्हणाले.www.konkantoday.com