
बेकायदा गुरांची वाहतूक, आरोपी अटकेत
बेकायदा गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी आबलोली येथील राहणारा रोहिदास पवार याला पोलिसांनी अटक केली आहे यातील पवार हा दोन दिवसांपूर्वी आपल्या बोलरो मॅक्स या गाडीतून गुरांची वाहतूक करीत होता गणेशखिंड येथील चेक पोस्टवर तो गाडी न थांबवता निघून गेला त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता गाडीच्या हौदांमध्ये दोन गाई व अन्य गुरे आढळून आली त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे
www.konkantoday.com