
निओमोशनची व्हीलचेअरसहित गाडी मिळाल्याने समीरच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला
.रत्नागिरी …कु.समीर चंद्रकांत सावंत.मु.पो. दोनवडे कातळवाडी ता.राजापुर जि.रत्नागीरी. वय ३० वर्ष.शिक्षण ४थी झाले.वडील श्री चंद्रकांत गोपाल सावंत शेती करतात तर आई चंद्रभागा चंद्रकांत सावंत गृहीणी आहेत.समीरला तीन बहीणी आहेत.दिपाली रुपाली आणी स्वप्नाली तिघींचीही लग्न झाली आहेत.समीर १० वर्षाचा असताना शेतातील बांधावरुन पडल्याने पायाला फ्रॅक्चर झाले.कणकवलीला गुडवील हॉस्पीटलमधे पायावर अॉपरेशन झाले.थोडे थोडे चालायला यायला लागले होते.पण परत दोनवर्षांनी पावसात पाय घसरुन पडला त्यावेळी फक्त प्लॅस्टर केले होते.त्यानंतर चालायला येणे पुर्णपणे बंद झाले.घरातच तीनवर्ष बसुन होता.पुढे शिक्षण घेता आले नाही. त्यानंतर २०१० साली हेल्पर्स अॉफ दि हॅण्डीकॅप,कोल्हापुर या संस्थेची माहिती मिळाली.तिथे शिक्षणासाठी अॅडमीशन मिळते का पहाणेसाठी गेला पण जागा फुल झाल्याने आणी वयही जास्त असल्याने अॅडमीशन मिळाले नाही.त्यानंतर २०११ साली हेल्पर्सच्या सिंधुदुर्गमधे असलेल्या स्वप्ननगरी या काजु प्रोसेसिंग युनिटमधे कामासाठी गेला.तिथे पहील्यांदा व्हीलचेअर वापरायला मिळाली.त्यानंतर आयुष्याला गती आली.तिथे काम करत असतानाच पुणे येथे महात्मा फुले योजने अंतर्गत मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स करणेसाठी काम सोडुन गेला.कोर्स केल्यानंतर गावी दुकान काढणेसाठी खुप प्रयत्न केला पण जवळ बाथरुमची सोय नसल्याने दोनवर्ष घरातच बसुन घालवावी लागली.परत २०१७ साली स्वप्ननगरी प्रकल्पात काजुयुनिटमधे कामासाठी गेला.तिथे काजुचे सिलिंग ग्रेडींगचे चांगले काम करत आहे. समीरला आरएचपी फाउंडेशन रत्नागीरीचे अध्यक्ष श्री.सादीक करीम नाकाडे यांची माहीती मिळाली.त्याच्या पालकांनी समीरचे नाव त्यांच्या संस्थेत नोंदविले.समीरची परिस्थीती जाणुन घेवुन आरएचपी फाउंडेशन आणी फ्रेण्ड्स फाउंडेशन ऐरोली यांच्या सहकार्याने इंम्पॅक्ट गुरु फाउंडेशनशी ओळख झाली.त्यांच्या मदतीने निओमोशन ही ईलेक्र्टीकल गाडी मिळाली.त्यामुळे समीरला बाहेर जावुन स्वत:ची काम करणे.कामाच्या ठीकाणी कोणाच्याही मदतीशिवाय जायला यायला खुप मदत झाली.तो सेल्फ डीपेंड झाल्याने त्याच्यामधील आत्मविश्वास खुप वाढला आहे.आता त्याच्यामधे कुठेही जावुन काम करु शकतो हा विश्वास वाढल्याने आयुष्याला नविन अर्थ प्राप्त झाला आहे.समीर आणी त्याचे पालकही खुप खुश आहेत. त्यांनी आरएचपी फाउंडेशन,फ्रेण्ड्स फाउंडेशन, इंम्पॅक्ट गुरु फाउंडेशन, बजाज आणी निओमोशन यांचे मनापासुन धन्यवाद मानले.