निलेश राणे यांच्यासाठी महापालिका बॅकफुटवर; ३.७७ कोटी थकबाकी असतांना केवळ २५ लाख घेत थकबाकी केली शून्य

करवसूलीसाठी सर्वसामान्य नागरिकांच्या घरासमोर बॅन्डवाजवून वसूली करणाऱ्या तसेच तो न भरल्यास जप्तीची कारवाई करणाऱ्या पुणे महागर पालिकेचा दुटप्पीपणा पुढे आला आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी पुण्यातील डेक्कन परिसरातील त्यांच्या व्यावसाईक मालमत्तेची ३ कोटी ७७ लाख रक्कम थकवली असतांना, त्यांच्याकडून केवळ २५ लाख रुपये घेऊन त्यांची थकबाकी शून्य केल्याचा प्रकार पुढे आला आहे. दरम्यान, ती रक्कम चुकून दाखवण्यात आल्याची सावरासावर करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. दरम्यान, राजकीय दाबवातून नीलेश राणे यांना ही सूट दिल्याची चर्चा आहे.नीलेश राणे यांची पुण्यात डेक्कन येथे आर डेक्कन नावाची व्यावसायिक मालमत्ता आहे. या ठिकाणी फूड मॉल, चित्रपट गृह, तसेच अनेक व्यावसाईक गाळे आहेत. या मालमत्तेवरील ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांकहा कर थकवल्याने बुधवारी पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही मालमत्ता सील केली होती. मात्र, पालिका उपायुक्त माधव जगताप यांनी मिळकतकर थकलेली रक्कम चुकून जास्त दाखवण्यात आल्याचे सांगितले. ३ कोटी ७७ लाखांचा मालमत्ताकरा ऐवजी राणेंच्या कंपनीकडून फक्त २५ लाखांचा चेक घेतल्यावर महापालिका प्रशासनाने राणेंवरील थकबाकी शून्य केली. एवढेच नाही तर सील केलेली मालमत्ता पुन्हा खुली करण्यात आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button