चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी संपूर्ण कोकणात विकासकामांचा एक आदर्श निर्माण केला
चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी संपूर्ण कोकणात विकासकामांचा एक आदर्श निर्माण केला आहे.गेल्या साडेचार वर्षात सह्याद्री खोऱ्यातील वाडीवस्तीवर जाऊन तेथील अडचणी, समस्या जाणून घेत आमदारांनी विकासकामांची गंगा आणली. संपूर्ण मतदार संघात सुमारे १ हजार ४७ कोटींची कामे मार्गी लावत विकासकामांचा नवा उच्चांक गाठला आहे.२०१९ पासून पायाला भिंगरी लावत मतदार संघातील प्रत्येक विभागात कार्यकर्त्यांची नवी मजबूत फळी उभारतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचा गड अभेद्य ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. शिवाय जलसिंचनासाठी सुरवातीपासूनच त्यांनी विशेष योगदान दिले. त्यातून अनेक गावांची टंचाईच्या विळख्यातून मुक्तता झाली आहे. अतिवृष्टी, महापूर, कोरोना तसेच फयानसारखी चक्रीवादळे आदी आपत्तींना तोंड देत त्यावर न डगमगता मात केली. या अडचणीतून पुन्हा उभारी घेत मतदार संघात विकासकामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. अर्थसंकल्प, ठोक तरतूद, लघुपाटबंधारे (पाझर तलाव), मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रादेशिक नळपाणी योजना, पतन तसेच विविध योजनांतर्गत १ हजार ४७ कोटी ३० लाख ५९ हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्याने मतदार संघातील अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. www.konkantoday.com