खेड न्यायालयात मराठी भाषा गौरव दिन -मातृभाषेतून आकलन चांगले – डॉ सुधीर एम. देशपांडे

रत्नागिरी, दि. (जिमाका)- मातृभाषेतून आकलन चांगले होते.प्रत्येक व्यक्तीने मराठीचे मूळ आत्मसात करणे गरजेचे आहे. भाषा जन्माला आली की, ती सहजा सहजी नष्ट होत नाही. जेवढे शक्य असेल तेवढे मराठी वापरले पाहिजे, असे खेड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश १ डॉ सुधीर देशपांडे यांनी सांगितले.* खेड तालुका विधी सेवा समितीतर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. देशपांडे बोलत होते. कार्यक्रमाच्या पहिल्या वक्त्या विधीज्ञ एम. एम. जाडकर यांनी, सर्वोच्च न्यायालयाने इएससीआर प्रणाली अंगिकारली आहे. त्यामुळे आता सर्व भाषांमध्ये निकालउपलब्ध असून, मराठी भाषेमध्येपण उपलब्ध आहे. मराठी भाषा रोज वापराची कार्यालयीन भाषा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषा संवर्धनआणि वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दुसरे वक्ते विधीज्ञ ए. पी. माळशे यांनी, कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ साली झाला. त्यांनी मराठी भाषेमध्ये साहित्य तसेच मराठी भाषेतून कवितांची निर्मिती केली आहे. मराठी माणसांनी मराठीतून बोलण्यातल्या चुका टाळल्या पाहिजेत. मराठी भाषा ही जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले. कनिष्ठ लिपीकआर. एम. पाटील यांनी मराठी भाषा गौरव दिन हा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी आपल्या साहित्यातून क्रांतीची प्रेरणा सर्वांच्यात निर्माण केली. त्यांनी मराठी भाषेची थोरवी आपल्या कवितेतून वर्णन केली आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमास तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्री चांदगुडे दिवाणीन्यायाधीश व स्तर श्री निसळ सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्री चव्हाण, २रे सह दिवाणी न्यायाधीश के स्तर श्रीमती पाटील तसेच पक्षकार वकील वर्ग व न्यायालयीन कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button