
भारत-चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा संघर्ष
भारत-चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा संघर्ष झाल्याची माहिती मिळत आहे. उत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्ये ही झटापट झाल्याचे सांगितलं जात आहे. या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाला एक दिवस राहिला असताना हा संघर्ष झाल्याने चिंता वाढली आहे.
विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच दोन्ही देशामधील तणाव कमी करण्यासाठी तब्बल १७ तास चर्चा झाली होती. ANI ने यासंबंधीचे वृत्त दिले असून भारतीय लष्कराने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
www.konkantoday.com